सोलार कृषी पंप योजनेमधील हे अर्ज होणार रद्द
Solar Pump Yojana: सोलार कृषी पंप योजनेतील हे अर्ज होणार रद्द.
March 27, 2023 by बैलगाडा शर्यत
Solar Pump Yojana: सोलार कृषी पंप योजनेतील हे अर्ज होणार रद्द.
Solar Pump Yojana: सिंचनासाठी होत असलेल्या डिझेलचा वापर टाळावा प्रदूषणावरती आळा बसावा, अशा अनेक कारणासाठी शासनाच्या माध्यमातून 90% अनुदानावरती सोलर पंप दिले जात आहेत. याच्यासाठी राज्यामध्ये पीएम कुसुम सोलर पंप योजना (PM Kusum Solar Pump Yojana) ही योजना राबवली जात आहे. परंतु योजनेची अंमलबजावणी होत असताना याच्यामध्ये बरेच सारे गैरप्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आलेले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या माध्यमातून, महाऊर्जेच्या माध्यमातून एक गंभीर दखल घेऊन या संदर्भातील काही माहिती देण्यात आलेली आहे.
सोलर पंप (Solar Pump) देण्यासाठी राज्यांमध्ये यापूर्वी अटल सौर कृषी पंप योजना (Atal Solar Pump Yojana) टप्पा १ व टप्पा २ असे दोन टप्पे राबवण्यात आलेले आहेत. याच्या नंतर मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना (Mukhyamantri Krushi Solar Pump Yojana) ही योजना 1 लाख सोलर पंपासाठी राबवण्यात आलेली आहे. याच्यानंतर आता 1 लाख सोलर पंपाचे उद्दिष्ट घेऊन राज्यामध्ये कुसुम सोलर पंप योजना (Kusum Solar Pump Yojna) ही योजना सुरू करण्यात आलेली आहे.
या योजनेची अंमलबजावणी होत असताना व लाभार्थी पात्र होत असताना ज्या शेतकऱ्यांकडे विजेची उपलब्धता नाही, त्यांना सिंचन करणे शक्य नाही किंवा जे डिझेल पंपाच्या माध्यमातून सिंचन करतात असे लाभार्थी पात्र होणे आवश्यक होतं. प्रत्येकाला कमीत कमी एक सोलर पंप तरी बसवण गरजेचं होतं. अंमलबजावणी होत असताना बऱ्याच सारे एजंटच्या माध्यमातून किंवा बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून या योजनेमध्ये गैरप्रकार ( Solar Pump Fraud) करण्यात आलेला आहे. एका शेतकऱ्याच्या नावावरती 2, 3 तसेच 4 सोलर पंप घेण्यात आलेले आहेत. आणि ही बाब आता महाऊर्जेच्या निदर्शनास आलेली आहे. आणि याच्यामुळे गंभीर अशी दखल महाऊर्जेच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे.
कुसुम ही योजना ( Kusum Solar Yojana) राबवत असताना पूर्णपणे आधार सिडींग केल्यामुळे, आधार संलग्न खात्यावरती किंवा आधार संलग्न नंबर नुसार त्या शेतकऱ्याच्या आधार नंबर नुसार त्या शेतकऱ्याची सोलर पंप देण्याची कारवाई केली जात आहे. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना असेल, अटल सौर कृषी पंप योजना असेल या योजनांमध्ये एवढा काही डाटा त्याच्यामध्ये घेण्यात आलेला नव्हता, यामुळे शेतकऱ्यांची ओळख पटवण खूप मुश्किल होत आहे. आणि आता कुसुमच्या अंतर्गत बऱ्याचश्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत.
ज्यांच्याकडे ऑलरेडी अटलच्या सौर पंप या योजने अंतर्गत सौर पंप मिळालेला आहे. व मुख्यमंत्री सौर या योजने अंतर्गत सौर पंप मिळालेला आहे. आणि तरी सुध्दा कुसुमच्या अंतर्गत सौर पंप मिळालेले जे शेतकरी आहेत त्यांचे इन्स्टॉलेशन होत असताना पूर्वी मिळालेले सोलर पंप ते काढून ठेवतात. त्यानंतर नवीन सोलर पंप लागल्यानंतर आपला जुना सोलर पंपही लावतात त्याच्यामुळे एकाच लाभार्थ्याच्या शेतामध्ये दोन दोन सोलर पंप तीन-तीन सोलर पंप आहेत.
एकाच लाभार्थ्याच्या नावावरती गावामध्ये पाच-पाच सहा-सहा सोलर पंप लागलेले आहेत. आशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांच्या माध्यमातून महाऊर्जाला देण्यात आलेल्या आहेत. असं महाऊर्जेच्या निदर्शनास आलेले आहे. ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची प्रक्रिया केली जात आहे किंवा अशा प्रकारचे शेतकरी चुकीच्या पद्धतीने लाभ घेत आहेत. त्यांच्यावरती गंभीर कारवाई करण्याचा इशारा महाऊर्जेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.
Solar Pump Yojana: सोलार कृषी पंप योजनेतील हे अर्ज होणार रद्द.
Grampanchayat Work: आपल्या ग्रामपंचायत मध्ये कोणत्या नवीन योजना आल्या? आणि कोणत्या नागरिकांना त्याचा लाभ मिळाला पहा ऑनलाईन.
ज्या शेतकऱ्याकडे पूर्वी मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेतून लाभ घेतलेला आहे. अशा शेतकऱ्यांनी जर अर्ज केलेला असेल, असे जर निदर्शनास आले तर त्या शेतकऱ्याचा अर्ज बाद केला जाणार आहे. त्या शेतकऱ्यांनी जर पैसे भरलेले असेल आणि सर्वेची वेळेस ही जर बाब निदर्शनास आली तर, त्या शेतकऱ्याचा अर्ज बाद करून त्याची जी काही भरलेली रक्कम आहे ही रक्कम जप्त केली जाईल. आणि त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा केली जाणार आहे. अशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे.
Solar Pump Yojana
याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे सोलर पंपचे इंस्टॉलेशन झालेले आहे व त्याच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारचे सोलर पंप निदर्शनास आले तर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्या शेतकऱ्यावरती गंभीर गुन्हे दाखल करण्याची कारवाई केली जाईल अशा प्रकारची माहिती महाऊर्जेच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. यामुळे पात्र जे शेतकरी वंचित राहत आहे त्यांना कुठेतरी या ठिकाणी दिलासा मिळणार आहे.
जो शेतकरी या पासून वंचित आहे ज्याला खरंच सोलर पंपाची गरज आहे असे शेतकरी मात्र अद्याप देखील या योजने पासून वंचित आहेत. त्याच्यामुळे आता ही कारवाई या वंचित असलेल्या शेतकऱ्यांना कुठेतरी दिलासा देणार आहे.
त्याच्यामुळे आपल्या नावावर जर पूर्वी सोलर पंप (Solar Pump Yojana) घेतलेला असेल तर आपण अर्ज करू नका आणि जर आपल्याकडे असं जर कनेक्शन असेल तर, पुढच्या प्रक्रियेमध्ये आपण सहभाग घेऊ नका, कारण जे शेतकरी सध्या विजेच्या उपलब्धते पासून वंचित आहेत अशा शेतकऱ्यांना किमान एक वेळ तरी याच्यामध्ये लाभ मिळणं गरजेचं आहे.
Related
Kusum Solar Yojana Eligible Farmer ListKusum Solar Yojana – कुसुम सोलर पंप योजना जिल्हा निहाय पात्र लाभार्थी यादी | Pm Kusum Solar Pump Eligible Farmer list
February 6, 2023
Pm Kusum Solar pump pricePm Kusum Solar: कुसुम सोलर पंप योजनेसाठी 2023 या वर्षात किती रक्कमेचा भरणा करावा लागणार
Kusum Solar Pump YojanaKusum Solar Pump Yojana: असा पहा तुमचा कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज पात्र आहे की अपात्र
Categorieskusum solar pump yojana, solar pump

Comments
Post a Comment